माझे स्वप्न

मतदारबंधू-भगिनींनो नमस्कार…

समता आणि सामाजिक न्याय म्हणजे समाजातल्या उपेक्षित घटकांसाठी विशेष सकारात्मक पावले उचलणे आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांत मुख्यत्वे शिक्षण आणि कौशल्य विकासात समान संधी मिळवून देणे. धार्मिक, जातीय, सामाजिक, प्रादेशिक, लिंगाधारित किंवा सामाजिक स्थानावर आधारित कोणतेही भेद न करता कायद्याचे राज्य आणणे, हे या पक्षाचे ध्येय आहे. श्रम आणि प्रतिष्ठा परस्परपूरक ठरले पाहिजेत. देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बांधील आहे. शांतता, प्रगती, एकतेच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास साधणे ही आमची विकासाची व्याख्या आहे.

माझा मतदार संघ हा स्वच्छ व सुंदर असायला पाहिजे असं माझं स्वप्न आहे. अलीकडच्या काळात लोक प्रतिनिधींकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्याने, नेत्यांनी अवास्तव आश्वासने न देता लोकांच्या माफक अपेक्षा पूर्ण कराव्यात असे माझे स्पष्ट मत आहे.

सद्यस्थितीत मतदार जागृत झाले आहेत. त्यामुळे नेत्याने लोकांच्या समस्या सोडविणे गरजेचे आहे. असे मला वाटते त्यासाठी सकारात्मक विचारसरणी ठेवून, पारदर्शी राजकारण करण्याची खरी गरज आहे असे माझे ठाम मत आहे.