नवनाथ रोहिदास पारगे बद्दल
सदस्य, जिल्हा परिषद पुणे, खडकवासला विधानसभा मतदारसंघ
सदस्य, जिल्हा परिषद पुणे माझं जन्म पुणे, वास्तव्य,ध्या मु. पो. डोणजे ता. हवेली जि. पुणे
माझे शिक्षण :- बी.इ
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा भारतीय राजकीय वर्तुळात अल्पावधीत अतिशय महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या मोजक्या राजकीय पक्षांपैकी एक पक्ष आहे. भारतीय राजकारणातील मातब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली १० जून १९९९ रोजी १३ व्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना करण्यात आली. नेत्यांच्या कार्यक्षमतेमुळे कमी वेळात पक्षाने जनमत संपादन केले. पक्षाची चमकदार कामगिरी आणि जनमताचा कौल पाहून भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला. नव्या राजकीय पक्षांची स्थापना आणि त्यांच्या विकासाच्या इतिहासात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाटचाल आदर्श, अतुल्य आणि नवा पायंडा घालून देणारी ठरली आहे.
• सामाजिक काम करत असताना आदरणीय शरद पवार साहेब व आदरणीय अजित दादा पवार यांच्या विचाररांच्या प्रेरणेने प्रभावित होऊन मी राष्ट्रवादि काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला.
• राष्ट्रवादि युवक काँगेस शाखा अध्यक्ष (डोणजे) या पदापासून माझ्या राजकीय जीवना ला सुरवात केली.
• तसेच पक्षाने माझ्यावर २००७ मध्ये राष्ट्रवादि विद्यार्थी काँगेस (पश्चिम हवेली) अध्यक्ष या पदावर माझी नियुती केली.
• सन २०10 मध्ये पंचकृषीतील मतदार बंधू भगिनी व वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने डोणजे गाव उपसरपंच पदावर काम कारण्याची संधी मिळाली.
• या सर्व कार्याची दाखल घेऊन पक्षाने मला सन 2012 मध्ये खेड - शिवापूर- खानापूर या जिल्हा परिषद गटामध्ये पक्षाने मला उमेदवारी जाहीर केली . व मी २८ या वर्षी ३१४० मतांनी विजयी झालो.
तसेच मतदार संघा मध्ये काम करत असताना गोर-गरिबांचे अश्रू पुसणे हे माझ्या रक्तात भिनले आहे. रंजल्या-गांजलेल्यांची सेवाही चईश्वर सेवा समजून मी आज वर हजारो गरजू नागरिकांना मदत करत त्यांचे अश्रू पुसण्याच प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
मानव सेवाही च ईश्वर सेवा समजून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देत जिल्हा परिषद मतदार संघात सतत नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम मी सातत्याने करीत राहीन.